Monday 14 August 2017

स्वतंत्र भारताचे गुलामीचे शिक्षण

आपल्याला स्वतंत्र होऊन ७१  वर्षे झाली पण तरीही आपण पाहिजे तेवढा बदल आपण आपल्या  देशामध्ये आणु  शकलो नाही .मला खूप कळत म्हणून मी बोलतेय अशातला भाग नाही पण एक जागरूक नागरिक म्हणून आजूबाजूला बघते तेव्हा जे जाणवत तेच लिहण्याचा प्रयत्न माझ्या लेखणीतून करतेय. शिक्षण हा पाया आपल्या देशाला मजबूत करतो असा आपण नेहमीच म्हणतो आणि हे २०० वर्षांपासून चालू आहे पण तरीही आश्चर्याची गोष्ट अशी आहे की आपली मानसिकता अजूनही बदलली नाही. आणि ती बदलावी अस कोणालाही वाटत नाही . आपली शिक्षण प्रणाली हे गुरुकुल प्रकारात मोडत होती. मुलांवर कुठल्याही प्रकारचं भार न देता त्यांना विविध विषयामध्ये पारंगत केलं जायचं . ते धनुर्विद्या असो किंवा मानस शास्त्र असो . जी विद्या एका विद्यार्थ्याला फक्त व्यवहारातच नाही तर स्वतःसाठी आणि शत्रूंपासून वाचवण्यासाठी उपयोगी येत असे. आता शत्रूंपासून बचाव करणे हा पर्याय राहिला नाही पण स्वतःला संकटकाळी सांभाळून ठेवणे हे समस्या उदभवली आहे.आताची शिक्षण प्रणाली फक्त पैसे कमावण्याचे विविध दार मोकळे करून देऊ शकते पण त्यातून जो पराभव वाट्याला येतो ते पचवण्याची क्षमता हे शिक्षण देत नाही .   इन्स्टंट मनी हा भयंकर रोग सध्या च्या पिढीला जखडून ठेवतोय ,मेहनत करण्याची तयारी नाही ,आलेला पराभव स्वीकारण्याची तयारी नाही, नात्यांना न्याय देता येत नाही. सगळीकडे फक्त नफा तोटा या दृष्टीतून बघण्याची सवय,सकस आहार न घेणं  हे खूप हानिकारक प्रकार या पिढीसोबत होत आहेत. ह्या सगळ्यांना पालकांची मानसिकता सोबतच  आताची शिक्षण प्रणाली जबाबदार आहे . हे  इतके वर्ष या क्षेत्रात काम केल्यानंतर जाणवलं . भारतीय संस्कृतीचे महत्व हे सगळ्यात आधी त्यापासून दूर राहण्याऱ्या लोकांना पटले पण आपण मात्र त्याचा वसा  डोक्यावर वाहूनही त्याला किंमत द्यायला शिकलो नाही. नालंदा आणि तक्षशीला हे भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट होती. पण ते आता लोप पावत चाललय . अंध  होऊन अनुकरण करण्यात आपण भारतीय मग्न आहोत. बोलायला बराच काही आहे पण माझा परत बोट शिक्षणप्रणालीकडेच जातो. 


         मी आतापर्यंत जे शिक्षण घेतले किंवा जे शिक्षण आताच्या भावी अभियंतांना देते त्यावरून आपण काहीतरी या भारताच्या भविष्यात हातभार लावतोय असे  वाटतच नाही. फक्त पैसे ह्या दृष्टीतून ह्याकडे बघणं मला रुचत नाही. फक्त मार्क्स आणि  स्पर्धा त्यासाठी वाटेल ते करायची मुलांची मानसिकता एवढच गणित शिल्लक राहिलाय. मला ह्या दृष्ट चक्रातून बाहेर पडणं आता शक्य नाही . म्हणून सक्षमच्या (माझा मुलगा) शिक्षणाबाबत मी अजून जागरूक झाले. "शिवाजी १० मार्कला येणार "हा विषय मुलांच्या मनात येतो याला कोणाला जबाबदार ठरवणार???त्याला इतिहास शिकवावं पण कस ?हा प्रश्न मला पडतो ??मार्कांसाठी नाही सिंहगडावर नेऊन त्याला शिवाजींबद्दल सांगावं,जे पुरावे आता उपलब्ध आहे त्यावरून त्याला इतिहास शिकवावा . म्हणून आम्ही खूप फिरतो. त्याला जे प्रश्न पडतात त्याचे उत्तर माझ्याकडे नसत पण आम्ही दोघे मिळून शोधतो . नो टेस्ट्स नो  exams फक्त इतिहासाची  मज्जा. माझ्या मुलाची क्षमता ठरवणारे मार्क्स नाही ,त्याला मॉनिटर करणारे शिक्षक नाही . ठराविक पाठ्यक्रम नाही. नो लिमिट्स .... आणि असेच बरेच पालकांना वाटत म्हणून homeschholers चा आकडा  दिवेसंदिवस वाढतोय . या शिक्षण प्रणालीमध्ये vision आणि मिशन हे जुळून आलेलं दिसत नाही. म्हणून ७१ वर्षानंतर हि आपण खर्च प्रगती केली का???हा प्रश्न मला कायम भेडसावतो 

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...