Monday 10 July 2017

अवघड पण समाधान देणारा एका आईचा निर्णय

"सक्षमला शाळेत न पाठवणं "हा आमच्या दृष्टीने खूप महत्वाचा विचार करून आणि दोघांनी एक मतांनी घेतलेला निर्णय आहे. आमच्या दृष्टीने तो तितकाच सहज असला तरी इतर लोक "काहीतरीच काय ??"म्हणून आम्हाला विचारत असतात . मुलाला शाळेत पहिल्यांदा पाठवायचंय  म्हणजे आई लोकांची जबरदस्त कसरत असते.  कुठल्या शाळेत टाकायचं ??ह्या पहिल्या प्रश्नापासून सुरवात होते. आपल्या मित्र मंडळीत शोभेल आणि जास्तीत जास्त स्टडी ओरिएंटेड हाय स्टेटस स्कूल,वेल सेटल ,फ्रेंडली इन्व्हॉर्नमेंट ,भरपूर ऍक्टिव्हिटी जिथे हे सगळं उपलब्ध असेल त्या शाळेमध्ये त्या २.५ ते ३ वर्षाच्या गोंडस चिमुकला/ली ची ऍडमिशन केली जाते . आणि ही प्रक्रिया मुलगा किंवा मुलगी जन्मल्यापासूनच सुरु होते. ह्यामागे स्कूल हा बिझनेस म्हणून उघडणाऱ्या लोकांचाच हात आहे

                                        
 हे बॅनर बघून सगळे पालक दिवसरात्र रांगे  मध्ये उभे असतात . मला शाळेत पाठ्वण्याला अजिबात विरोध नाही पण आजकाल शाळेच्या नावाखाली जे चालतंय त्याचा मला विरोध आहे . माझ्या स्वतःकडे शिक्षणातली उच्च  डिग्री असूनही मी हा निर्णय घेतलाय ह्याच लोकांना जास्त आश्चर्य वाटत . ते बरोबरही आहे मी हे सगळं जवळून पाहिलंय म्हणूनच त्या शिक्षण प्रणालीचा एक भाग असूनही मी माझ्या मुलाला शाळेत पाठवणार नाही. त्याच बालपण तिथे कोमेजून जात . कुठलीही एक गोष्ट दिल्या गेलेल्या साच्यातच झाली पाहिजे असा तिथल्या शिक्षकांचा आणि घरी येऊन पालकांचा हेका असतो . चौकटीबाहेर त्या मुलाला जर करायचं असेल तर त्याला स्वतंत्र नाही .स्वतःच्या मातृभाषेत बोलायचं नाही . इंग्लिशच बोलायला पाहिजे ,आजच्या युगातील बेस्ट कम्म्युनिकेशन  माध्यम आहे अस पालकांना वाटत . माझ्या मुलाला ग्लोबल व्हायला पाहिजे हा त्यांचा रेटा असतो . ग्लोबल ह्याची व्याख्या एका जापनीज माणसाला विचारली असता त्याने सुंदर शब्दात मांडली आहे  आपली संस्कृती, आपली भाषा, आपली मुळ  नीट समजावून घेतल्यावर जगातील इतर संस्कृतींना सहिष्णू दृष्टीने समजावून घेणे म्हणजे ग्लोबल ...... त्यासाठी संवादाची भाषा म्हणून इंग्रजीची गरज पडेलही  पण अनुकरणाचा नाही तर समजावून घेण्यासाठी .जर तुम्हाला  स्वतःच्या मातृभाषेतील साहित्यच जर नीट वाचता येत नसेल  तर तुम्ही इतर संस्कृतींना कसे समजावून घेणार???आणि खऱ्या अर्थाने ग्लोबल  कसे होणार ??????? म्हणून भारतीय पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात . इयत्ता ५  मधील एका विद्यार्थाला सिंहगड बद्दल १० ओळी
 लिहायला सांगितल्या त्याने इंग्रजीमध्ये लिहल्या .( मातृभाषा मराठी पण शिक्षण मात्र इंग्रजी माध्यम) हा विद्यार्थी आधी विचार मराठी मध्ये करतो आणि नंतर इंग्रजी मध्ये भाषांतर करून लिहतो ,लिहताना त्याला शब्दांची कमतरताही जाणवते पण याउलट ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा आणि शिक्षणाचं माध्यम एकच आहे तो जे विचार करतो तेच कागदावर उतरवतो त्यामुळे त्याला एक जिवंतपणा येतो. आणि समजून लिहता येत. पण मातृभाषेत शिक्षण घेणं हे पालकांना रुचत नाही .त्यांच्या स्टेटस मध्ये बसत नाही .... आपल्या अपेक्षांचं ओझं आपण मुलांवर लादतो तू असाच केलं पाहिजे ..... तरच तुला चांगली नोकरी मिळेल ..... हे त्याच्या मनावर बिंबवलं असत. सगळे पालक असे नसतीलही पण पीयर प्रेशर असतंच.... 
फक्त पैसे आणि उच्च जीवनशैली मिळेल  हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण दिल्या जात किती चुकीचेआहे  हे!!!!! हे ध्येय समोर ठेऊन तो फक्त आयुष्यभर एम्प्लॉई म्हणूनच काम करू शकेल स्वतःचा उद्योग चालू करून दुसर्यांना एम्प्लॉई ठेवण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे त्याला चौकटीबाहेर जावच लागत ... 




असे असंख्य उदाहरण बघून ,त्यांना भेटून ,चौकटीबाहेर पडून ,लोकांना न जुमानता आम्ही हा निर्णय घेतला. आणि "होम स्कूलर्स " हा ग्रुप पुण्यामध्ये जॉईन केला. तेव्हा असे वाटले फक्त आपणच असा विचार करत नाही आपल्यासोबत असे अनेक पालक आहे ज्यांना असच वाटत..आपला मुलगा स्कूल मध्ये जाऊन जे करतोय त्यापेक्षा तो "गूगल  युनिव्हर्सिटी  "मधून जास्त चांगला शिकतोय तेही स्वतःच स्वतः ..... खरच  प्रशंसनीय आहे . एक उदाहरण द्यायचं झालं तर या ग्रुप मध्ये माझ्यासारखीच एक आई मला भेटली ,ती एक उत्तम चित्रकार आहे सुंदर पैंटिंग्स तिने बनवलेले आहे ,तिचा मुलगा वय वर्ष १४ त्याने तिच्या पैंटिंग्सला   भारतातच नाही तर विदेशात सुद्धा एक उत्तम व्यापारीकरण उपलब्ध करून दिल गूगल हे माध्यम वापरून  जे एका एम बी ए मार्केटिंग वाल्याला सुद्धा जमल नसत.... म्हणून सक्षमला घरी शिकवण्याचा निर्णय घेतला .आम्ही दोघेही घरी शिकतो .. आणि शिकताना मज्जा करतो ... ते रेसिपी असेल,सायन्स असेल , भूगोल असेल , आर्ट अँड क्राफ्ट असेल , डान्स असेल म्युझिक असेल ...... बरच काही आणि आईच आपली शिक्षक आहे हे तर त्याच्या साठी खूप आनंदाची गोष्ट आहे .आणि त्याचे मित्र हे त्याच्या वयोगटातील तर आहेच पण सेक्युरिटी वाले काकाही त्याचे मित्र आहेत मित्र बनवण्यासाठी त्याला बंधन नाही .  मी होम स्कूल मध्ये जातो आणि माझी टीचर आई आहे असा तो सगळ्यांना सांगतो.... 

2 comments:

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...