Tuesday 2 May 2017

एक आगळा वेगळा वाढदिवस

आम्ही दोघही मुलाचा वाढदिवस  कसा grant करता येईल याचं  नियोजन करत होतो . पंच तारांकित हॉटेल्स  याची यादी काढायला  सुरवात केली ,त्यानंतर  मेनु काय काय असावे ?मित्र  ,आप्त  मंडळी ,नातेवाईक मुलाचे मित्र अशी भली मोठी यादी तयार झाली . जवळपास एक महिना अगोदर हा वाढदिवस special  कसा करायचा याचेच विचार मनात चालू होते. हातात खेळणा रा पैसा ,मित्रांमध्ये दाखवता यावी अशी श्रीमंती आणि मुलाच कौतुक या सगळ्यांचे  खूप मोठे नियोजन करण्यामध्ये आमचा वेळ जाऊ लागला . ज्याच्यासाठी  हे  नियोजन चालल होत तो मात्र या सगळ्यापासून अनभिज्ञ  होता फक्त आपले आई बाबा आपल्याला वेळ देत नाही म्हणून त्याची चिडचिड चालली होती . माझा मुलगा सक्षम वय वर्ष २. सगळ नियोजन एकदम  छान  झालाय म्हणून आम्ही दोघही शांत झोपलो . आमंत्रण पाठवून झाले. पण त्या दिवशी कॉलेजला  अचानक लवकर सुटटी मिळाली .लवकर घरी जावं आणि राहिलेली तयारी पूर्ण करावी या विचारात गाडीचा वेग वाढवला ,पण गाडीचा चक्का जॅम ..... हुश्श !!!आता एक तास त्यामध्ये जाणार होता गाडी दुकानदाराकडे सोपवून वेळ कोठे घालवावा असा विचार करत होते. रस्त्यामध्ये मातोश्री  अनाथाश्रम आणि वृद्धश्रम मला रोज जाता येता दिसायचे पण जायचं धाडस कधी झालं नाही...

Image result for matoshri vrudhashram pune

आज गाडी बंद पडण्याचं निमित्त मिळालं . मी फक्त आतमध्ये डोकावून बघावं म्हणून कोणालाही दिसणार नाही अशा आडोशाला उभे होते साधारण  वयोगट ३ वर्षांपासून पुढील वयाची मुले आणि मुली असतील . आई बाबा नाही म्हणून किंवा घरची परिस्थिती गरीब म्हणून काही शिक्षण मिळतंय म्हणून तिथे आली असावी . कुढलाही दुःख ना कुर्वाळता ते मुले स्वच्छंद बागडत होती . हसत होती खेळत होती , मनात विचार आला ह्यांचा  वाढदिवस ठाऊक असेल का कोणाला?आपण उच्च सोसायटीतील लोक म्हणून आपल्याला पैसा खर्च करायचा आहे ,श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं आहे म्हणून हे सगळं जमतंय . त्यांना ज्या दिवशी चांगलं जेवायला मिळेल ,चांगले कपडे घालायला मिळतील हेच त्यांचं सेलिब्रेशन .... हे लहान मुले ह्या जगाच्या डावपेचांपासून खूप दूर आहे माझा सक्षम काय किंवा हे लहान मुले काय.... गरीब ,श्रीमंत ,हा भाव अजून त्यांच्यापर्यंत पोचलाच नाही. आपल्याला खेळण्याचं स्वातंत्र्य आहे दोन वेळेस जेवायला मिळतंय हे त्यांच्यासाठी खूप आहे!!!
तेव्हाच ठरवलं आपण सेलेब्रेशन तर नेहमीच करतो .... दोन शब्द कौतुक करून लोक निघून जातील.... पण तो आनंद फक्त क्षणभर असेल.. आपण सक्षमचा वाढदिवस ह्या मुलांबरोबर साजरा करूया... अस मनाशी पक्क करून निघाले. ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना venue बदल झाल्याचा फोन केला आणि सगळ्यांना मातोश्रीला या म्हणून सांगीतले . बरेच लोक venue ऐकून आलेच नाही काही प्रेमापोटी आली काही चांगलं वाटणार नाही म्हणून हजेरी लावायला आली .... पण लोकांचा विचार बाजूला ठेवला तर सगळ्यात जास्त एन्जॉय केलं ते सक्षमने त्याला त्याच्या वयाचे मुले दिसले जे नेहमी दिसणारे नव्हते ... त्यांचे खेळ ,त्यांचे बोलणे उगाच इंग्लिशचा आव आणणारे नव्हते . तिथे संध्याकाळी जमणाऱ्या आजी आजोबांसोबत गप्पा मारल्या आणि सगळ्यांसोबत "वदनी कवळ घेता " म्हणता म्हणता तो घास अधिकच गोड  वाटू लागला . हे मात्र नक्की उल्लेखनीय आहे तिथे आमंत्रित लोकांच्या बच्चे कंपनीने मात्र खरंच एन्जॉय केलं.. आणि आम्हाला मिळालं समाधान एक वेगळा वाढदिवस साजरा  केल्याचा  .... 
Image result for matoshri vrudhashram puneImage result for matoshri vrudhashram pune


2 comments:

  1. The blessings you all hv got from all of them would have a very lasting effect on your lives... many god shower all his choicest blessings on you and your family.
    Tc and Big thank you for inspiring many more to think about it...

    ReplyDelete

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...