Wednesday 17 May 2017

मी आणि स्वयंपाकघर .....


 बाईचे  आणि स्वयंपाकघराचे नाते  हे  कितीतरी प्रकारचे असू शकतात, कोणाचं नातं हे कामापुरते असेल ,कुणाचे  सुट्टीच्या दिवसांपुरते मर्यादित ,कुणाचे रोजचे जिवाभावाचे घट्ट ..... माझं नातं तिसऱ्या प्रकारात मोडतं . मुळातच "खावे तर चवीने ,जगावे तर मानाने "ह्या वळणावर सरळ चालणारी मी . सकाळच्या चहाचा  स्वादसुद्धा कसा दरवळला पाहिजे आणि त्याच्या वाफेसोबत आपला  दिवसही प्रसन्न असायला पाहिजे . जोडीला गरम गरम   पोहे ,त्यावर खुलून दिसणारी हिरवी कोथिंबीर आणि बाजूला डोकावणारी लिंबूची फोड जेव्हा समोर येते तेव्हा सुटणारे पोट ,सुरु असलेले डाएटिंग ,ह्याचा विसर पडतो. हे   समीकरण म्हणजे लग्ग्न जुळवून आणि नंतर टिकवून ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडते. मुलगी पसंत नव्हती पण पोहे आणि चहा ह्याच्या चवीला बघून हो म्हणालो बर का!!त्यावरून तू उत्तम गृहिणी पण असशील हे ओळखलं म्हणून लग्ग्न केलं ..... इति नखरे असलेले आमचे नवरे . मुळातच मला हॉटेल मध्ये जाऊन किंवा मागवून जेवणे हे पटत नाही. तिथली बाहेरची चकाकी सोडली तर आतमधली चकाकीवर न बोललेले बरे शिवाय पैसे फेकून मागवले अन्न हे कुठल्या भावनेने बनवले असणार ? पण आम्ही मात्र आमचं स्टेटस सिम्बॉल जपून ठेव ण्यासाठी महागड्या हॉटेल मध्ये जातोच ,तिथलं टोमॅटो सूप ओरपून , ... आईच्या हातची चव नाही बाबा अस म्हणत वीकएंड साजरा करतो. कशी असणार ??पदर खोचून ,सकाळपासून राबून ,प्रेमाने ,आनंदाने बनवलेले साधे वरण ,भात ,भाजी ,पोळीचे जेवण सुद्धा भुकेच्या वेळेच्या आधीच समोर  येते त्याची किंमत नाही मोजता येणार ,हॉटेलच्या जेवणाची सर देखील नाही येणार . घरी आलेला पाहुणा तोही माहेरचा असेल तर मग विचारायलाच नको (खरं असेलही कदाचित .... नवऱ्याची टिपणी )स्वयंपाकघरातुन येणारे आवाज ,सुगंध हे रोजच्यापेक्षा वेगळे येतात . आणि आलेला पाहुणा हा खाण्यासाठीच आलेला होता अस वाटायला लागत कारण आहेच तस ..... वरणाची फोडणी हि जादाची हिंग,कढीपत्ता ,कोकम आमसूल घालून केलेली असते, चवीला रोजची कोशिंबीर  असतेच पण सोबत तीन रंगाच्या वेगवेगळ्या चटन्या हि  असतात , लोणच्याची जुनी भरणी निघाली असते त्याबरोबरच काजू पेरलेला शिरा ,तूप मोकळ्या हाताने सोडलेली गरम पोळी, मऊ भात ,आंब्याच्या रसाची वाटी चारोळी घालून सजवली असते. दुपारचा खमंग चिवडा ,भेळ ,    आ इसक्रीम ,संध्याकाळी चायनीज ,साऊथ  इंडियन .... घर बसल्या हॉटेल चे मेनू मिळतात ... जीवन फक्त खाण्यासाठीच आहे ... आणि ते खरंच सुंदर आहे. हा आभास होतो . 
नवीन लग्न होऊन घरी आली तेव्हा आपल्याला स्वयंपाकघराचा ताबा मिळणारच नाही अस वाटत होते कारण एक सुगरण हात तिथे असतांना माझे काम फक्त भाजी वाणवणे ,कणिक मळणे ,पाणी भरणे एवढेच होते पण हळू हळू तो सुगरणपणाचा वारसा सुनेकडे सोपवून त्या निवृत्त कधी झाल्या हे कळलेच नाही . पण मला अजूनही त्यांची नजर इकडेच आहे अस वाटत म्हणून कि काय स्वयंपाक अजून रुचकर होतो. रेसिपी वाचून आपल्याला मीठ ,तेल टाकता येऊ शकत पण साखरेचा दोन तारी आणि गुळाचा एक तरी पाक ओळखायला ,भाजी करपायचा वास ओळखायला अनुभवाचे बोल लागतात . आमच्या दोघींच्या भांड्याचा आवाज हा कधी वाढलाच नाही. तो कायम एकमेकांना सांभाळत येत आहे ... त्यामुळे पदार्थांचे  दरवाळणारे सुगंध हे अजूनही  येत राहतात .तसेच भाजिला जास्त झालेलं तिखट ,कमी पडलेलं मीठ हे कधीही आमची चव घालवत नाही . 

   Mom's kitchen open for 24 hours 
Image result for  kitchen watches

No comments:

Post a Comment

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...