Saturday 21 March 2020

मनापर्यंत घेऊन जाणारी शांतता...आज गवसली

आजची सकाळ खरंच काहीतरी वेगळी होती. लवकर उठायचं नाही आज कुठे धावायचं नव्हतं पण तरीही सकाळी जाग आली अगदी पहाटे पहाटे सूर्य उगवतांना सुद्धा आज काहीतरी वेगळा आभास होत होता. हा आभास पुढे येणाऱ्या आंधी चा होता की एक सुंदर जाणीवपूर्वक उगवलेली होती ह्याचा अंदाज येत नव्हता. मन थोडंसं खट्टू होत हा virus भारतात आला नसता तर आज आम्ही मुक्तागिरी ,अंजनगाव ला जाणार होतो .  माझ्या भाच्याचा आज पहिला वाढदिवस साजरा करणार होतो. दोन दिवसांनी माझाही वाढदिवस येणार होता ,डोक्यात असंख्य प्लांनिंग तयार होते. पण ..... हे काय पहिल्यांदा हे सगळं रद्द करण्याचे कारणे काहीतरी वेगळीच होती.उठून गॅल्लरी मध्ये खुर्चीत जाऊन बसले बाहेर एकटक पाहत होते. गेल्या दोन -तीन दिवसांपासून काहीतरी वेगळंच घडतंय वातावरण भीतीने,आकुलतेने भरून गेलेलं आहे. का घडत असेल हे सगळं ????
आज मन कुठेतरी अंतर्मनात डोकावलं डोळे घट्ट मिटून घेतले ,एक मोठा  श्वास घेतला आणि खरंच जाणवलं अरे आज सगळीकडे शांतता जाणवतेय .अगदी आतमध्ये सुद्धा . समोरच्या रो -हाऊस मध्ये बरीच उंच उंच हिरवीगार झाडे आहेत ,पक्ष्यांची घरटे देखील आहेत. आज पहिल्यांदा इतक्या पक्ष्यांचा आवाज ऐकायला आला होता. मैना ,पोपट ,कावळा ,कोकिळा आज अगदी स्पष्ट आवाज कानी पडत होता. हा आवाज रोज असतो कि आजच आला ???कदाचित रोजच होता पण गाड्यांच्या आवाजाखाली विरून जात होता. बोगनवेलची रंगीत फुले झाडावर दस्तक देत होती . आज रस्त्यावर पडलेली आणि वाळलेली झाडांची पाने देखील नावीन्य पूर्ण दिसत होती .  रोज  गॅल्लरीत येऊन सुद्धा   लक्ष कधी तिकडे गेलेच नाही .रोज कोणीतरी धावतंय ,गाड्या ऑफिस साठी पळताय ,मुले स्कूल साठी धावतंय फक्त धावणे आणि पळणे इतकेच मन वेधून घेत होते आणि ह्या घाईमध्ये नकळत मी सुद्धा पळतच तर होते.पण आज ही शांतता हविहवीशी वाटत होती. मला माझ्यापर्यंत पोहचण्यासाठी हीच शांतता हवी होती . अरे....... !!!! आपण खूप दिवसांपासून काहीतरी शोधत होतो  ,काहीतरी हरवलं अस वाटतं होत हेच तर आहे ना ते !!!मनापर्यंत घेऊन जाणारी शांतता !!! 

कोरोना virus हे फक्त प्रकृतीचे मानवजातीला  एक ओरडून सांगणे तर नसेल ना??अरे थांबा !!!किती ओरबाडून घेणार आहे माझ्याकडून ???तुमच्यापेक्षाही कोणी श्रेष्ठ शक्ती या विश्वात आहे. या आधी प्रकृतीने ओरडून ओरडून सांगितले तरीही तिचा  आवाज तुम्ही ऐकून न ऐकल्यासारखा केला ..आज तिने  गंभीर रूप धारण केलं हे तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी . आता तरी जागे व्हा !!!कुणालातरी घाबरा !!  
खरं तर एकदा हात जोडून प्रकृतीला धन्यवाद द्यायला पाहिजे कि वेळेतच आमचे  डोळे उघडले हे बरे झाले. आणि तन ,मन एकत्रित करून आज प्रकृतीची क्षमा मागायला हवी. आम्ही यापुढे कधीही  बेजबाबदार रीतीने प्रकृती सोबत  वागणार नाही .

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...