Monday 29 May 2017

उत्स्फूर्त जगायला शिका ……….


सगळ्या ताणतणावात उत्स्फूर्तता जिवंत ठेवण हा एकट पडण्यापासून टाळण्यासाठी ,निराशा दूर ठेवण्यासाठी फार महत्वाचा उपाय आहे अगदि छोट्या  छोट्या गोष्टी पण आपण खूप आखीव रेखीव चौकटी प्रमाणे करायला जातो आणि त्याची सहजताच गमावतो आपण उच्च पदावर काम करतो म्हणजे मोठ्याने हसता येत नाही ,गाण गुणगुणता येत नाही रस्त्यावर उभ राहून शेगदाणे तोंडात टाकता येत नाही jokes मारून हसता  येत नाही हे कोणी ठरवलं?तुम्ही आम्हीच न ?मग आपणच शिकायला हव ह्या सगळ्यातून बाहेर पडायला..... काय म्हणता?काही गोष्टी जर सहज घडत असतील तर त्या इतक्या सहज घडल्याचं कशा ?हा प्रश्न समोर उभा राहतो.आपण आपला आनंद हा कृत्रिम गोष्टींमध्ये जास्त शोधतो. ज्या झकपक दिसतात आणि पैसे खर्च करून मिळतात. प्रत्येक वीकएंड कुठे घालवायचा ह्याचे नियोजन आधीच सुरु होते . मग कुठेतरी दुसऱ्याच ऐकून  sight seeing ला जातो आणि काहीतरी थातुर मातुर बघून वेळ आणि पैसा खर्च करून येतो ,आणि आजकाल मॉलचे फॅड खूपच वाढले आहे तिथला कृत्रिमपणाचं प्रदर्शन पाहून कंटाळा यायला लागतो .रोज काय घेणार तिथून?पण तिथल्या झकाकी वर आपण मोहून जातो .याउलट नैसर्गिग गोष्टींचा शोध आपण घेऊ शकत नाही ज्या सहज मिळतात त्या गोष्टींकडे आपले लक्षच जात नाही .सुंदर वाऱ्याची झुळूक,मोगऱ्याच्या फुलांचा सुंगंध,एखादी आवडती गाण्याची धून , मित्रांसोबत मारलेल्या गप्पा,भावंडांसोबत घालवलेल्या सुट्या,दुपारी हात पाय पसरून काढलेली झोप,ह्या सहज मिळणाऱ्या गोष्टी महाग झाल्या आहेत.  

आयुष्य सगळं कृत्रिमतेणे व्यापलंय ,कुणाकडेही जायचं म्हटलं तरी आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. सहज साधं सोपं अस काही राहीलच नाही . तुमचे कपडे सुद्धा तुम्हाला तुमच्या स्टेटस ला साजेसेच घालावे लागतात , तुम्हाला बोलताना सुद्धा उधार आणलेली इंग्रजी भाषाच वापरावी लागते ,ज्यानी समोरच्यावर छाप पडेल .एखाद्या संथ नदीला बघितलं तर दुरून त्याच्या गहिरेपणाची अनुभूती येणार नाही पण त्यामध्ये पाय टाकल्यावर लक्षात येईल नदीची खोली खूप आहे. आणि खळखळ आवाज करून वाहणाऱ्या नदीला बघितलं तर दुरून वाटेल नदी खूप खोल आहे पण मुळात खोली नसून तो फक्त खळखळाट असतो. असच असत आपलाही  जो जास्त प्रदर्शन करायला जातो मुळात तिथे काहीच नसतं ,तो फक्त कृत्रिम दिखावा असतो. आपण   आपल्या मध्ये कधी झाकूनच पाहत नाही लोकांचं बघून,लोकांसाठी जगतो. माणसाची सादगी ,साधेपणा त्याच्या अंतरंगाची ओळख करून देऊ  शकते . शेवटी खोटा मुखवटा किती दिवस टिकणार?तो कधीनाकधी फाटणारच पण जे शाश्वत आहे ते कायमस्वरूपी राहील त्याला प्रदर्शनाची गरज नसते . 

No comments:

Post a Comment

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...