Wednesday 13 September 2017

अनुभवातून गिरवलेला धडा

आज सक्षमला  घेऊन एका होम स्कूल co -opp ला गेले होते. साधारण ३ ते १० या वयोगटाची मुले आणि त्यांचे पालक तिथे जमले होते . एका कॉफी जार कॅफे मध्ये आम्ही भेटलो . कॅफे चालवणारी लिसा ही सुद्धा एक होम स्कूलर मुलांची आई आहे . त्यामुळे तीची जागा आम्ही महिन्यातून एकदा भेटण्यासाठी वापरतो . जे शिक्षण शाळेत मिळूच शकत नाही अस exposure मुलांना मिळतं . कुणाचा धाक नाही, वेळेचं बंधन नाही,अभ्यासाचे ओझे नाही ,कुणासोबत स्पर्धा नाही मार्कांचा आकडा  नाही  . स्वछंद सोडल्या नंतर मुलांमध्ये किती talent आहे हे लक्षात येत . एका टेबलवर भरपूर कलर्स अक्षरशः सांडलेले होते सगळ्यांना एक एक कोरा कागद देण्यात आला . पाहिजे ते साहित्य उचला आणि आपली कला दाखवण्यास त्यांना पुरेसा वेळ देण्यात आला. अप्रतिम चित्र मुलांनी आपापल्या क्षमतेनुसार रेखाटली. असच करायला पाहिजे हे सांगणार त्यांना कोणी नव्हतं . साच्यातली चित्र त्यांनी काढली नाही . त्यामुळे एकही चित्रात गवत खाणारी गाय किंवा दोरी खेळणारी मुलगी दिसली नाही. दिसले ते ३d अँगल ने मुलांनी कल्पना केलेले चित्र . त्याची तुलना होऊच शकत नाही . हाताची बोटे वापरून सुंदर निसर्ग चित्र रेखाटल्या गेले . यावरून एकच लक्षात आले मुलांना जर मदत करायची असेल तर एवढंच करा कि "त्यांना कुठलीच मदत करू नका " . हे घोड्याचं चित्र आहे हे त्यांच्या मानस पटलावर बिंबित करण्यापेक्षा , जेव्हा खरंच घोडा त्याच्या डोळ्यसमोर येईल तेव्हा त्याला आलेली अनुभूती ही  कायम त्याच्या स्मरणात राहील . हे ज्ञान कायमस्वरूपी असत. 

असच खेळण्याच्या बाबतीत सुद्धा आढळत . आधी मी १० दिवसातून एकदा खेळण्याच्या दुकानाला भेट द्यायचे आणि विशेष वेगळे वाटणारे खेळणे हे मी सक्षम साठी निवडायचे . उच्च किमतीचे ,ब्रॅण्डेड खेळणे निवडण्यामागे माझा कल होता . पण काही दिवसात तो त्या खेळण्यांना कंटाळून जातो .  हळूहळू लक्षात आले आपण त्याला हातात खेळणे देऊन त्याच्या creativity वर बंधन घालतोय .  म्हणून एक नवीन प्रयोग सुरु केला घरात जे खोके ,प्लास्टिकचे बॉक्सेस ,चमचे , टाकाऊ सामान आहे आम्ही त्यातून वेगवेगळे निर्मिती करू लागलो . आणि कुणाचा विश्वास बसणार नाही अशा युक्त्या मला त्याच्याकडून ऐकायला मिळतात . रस्त्यावरचा ट्रॅफिक जॅम हा कसा डायव्हर्ट होतो हे त्याने मला प्रयोग करून दाखवले . तेव्हापासून शॉपिंग मॉल मध्ये जाऊन माझे ब्रँडेड खेळणे आणणे बंद झाले. मुलांची निसर्गाशी फार लवकर मैत्री होते . पण आजकालच्या शहरी वातावरणात आपण मुलांना कृत्रिम जगाशी ओळख करून घेण्यास भाग पाडतो .माझ्या मुलाला  सामाजिक जाणीव असली पाहिजे हि पालकांची अपेक्षा फोल ठरते .झाड ,नदी,डोंगर , जंगल ,प्राणी ह्यांच्याशी मुलांची लवकर मैत्री होते . कारण त्यांना ते आपल्यापेक्षा वेगळे वाटतात . नैसार्गिग घडणाऱ्या गोष्टींकडे मुलांचं आकर्षण असत. आपण मात्र readymade knowledge मुलांना देतो .
म्हणून मला एक नवीन पैलू जाणवतोय . पुस्तकी ज्ञान तर मी खूप मिळवलं ,पण सक्षमसोबत परत एकदा अ आ इ पासून शिकावयास वाटतंय .   

No comments:

Post a Comment

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...