Tuesday 18 June 2013

मला दिसलेलं भविष्य …।

उन उतरणीला आली होती बाहेर हलकासा पाऊस  आवाज करत होता . तोच परिचित गारवा …. आता आपली मैत्रीनिनसोबत गप्पा मारायची वेळ झाली आहे हे मला कळून चुकले. बाहेरच्या पावसाचा आवाजच आनंद देणारा होता पण रोजनिशीचा एक भाग म्हणून सोफ्यावरून  उठून मी आपल्या खोलीकडे जायला वळली  पण आपला घसा कोरडा झालाय हे लक्षात येताच ४ 0 डेसिबल पेक्षाही कमी आवाज sense करू शकणाऱ्या  रोबोट्ने श्वासोश्वास ओळखला आणि त्याच्यामध्ये फीड केलेल्या program प्रमाणे अगदी यांत्रिकी आपुलकीने "पाणी दुध ज्यूस " असे तीन पर्याय दिले आणि विचारपूस केली.orange  flavor ज्यूस हा पर्याय निवडल्यावर त्यामध्ये असणाऱ्या शर्करेचे (sugar )  चे मोजमापक माझ्यासमोर वाचले त्यामुळे माझा रक्तदाब वाढेल ह्याचा पाढा रोबोट्ने वाचला मी  रागाने जीभ चावुन फक्त पाणी आण अशी आज्ञा केली . माझ्या family डॉक्टर ने त्यात काही commands save  केल्या होत्या आणि तो रोबोट त्याप्रमाणे बोलत होता . 
fingerprints  देऊन मी खोलीचा दरवाजा उघडला खोलित येताच सगळी विद्युत उपकरणे चालू झाली .remote हातात घेऊन बटन दाबताच गुलाबी रंगाचे हिरवी किनार असलेले पडदे सरकले. आणि माझ्या स्क्रीन वर अनुक्रमे खालील पर्याय झळकले ……. 
१) फोन करणार  ?
२) T .V बघणार ?
३) खरेदी ?
४)घरची कामे ?
५) इंटरनेट हवेय ?
६) इतर काही मदत ?

मी पहिला पर्याय निवडला लगेच ६-G  च्या मदतीने माझी मैत्रिण मला समोर दिसू लागली . कुठे बसायचं ? अस जुजबी बोलण झाल्यानंतर मंदिराच्या पायरीवर बसुया असे ठरवले आणि call मागची theme मंदिरची पायरी निवडली .virtual पायरीवर आम्ही बसलो होतो आतमध्ये देव मात्र तोच होता …। आणि गप्पांना सुरवात झाली …। 

कशी आहेस सून काय म्हणते पासून ते रेवा (आमची तीसरी मैत्रीण ) हल्ली call वर येत नाही इथपर्यंत सगळ बोलून झाल . अजून Advance उपकरण येणार आहेत येत्या दिवाळीला घरी असा तिच्याकडून कळल . बहुतेक मनातल्या भावनाही न बोलता sense  केल्या जातील असा वाटतय . खूप मूड होतोय बागेत जाण्याचा पण virtual नाही …। असा म्हणताच मी पण दुजोरा दिला . आणि कधीची जागा available आहे हे पहिले आणि १ जाने  २ 0 ४ ७  निवडली . माझी मैत्रीण कुठलातरी विचार करतेय हे कळल्यावर मी तिला आठवण करून दिली " रोबोट्ने expression sense केलेत तर मुलाला आणि सुनेला sms जाईल"आणि हे ऐकताच तिने कसेबसे हसू आनले. 

काल माझ्या नातीने मला तुमच्या काळातील कॉम्पुटर ची गोष्ट सांग आणि तिला तिच्या मिस ने मामा वर essay लिहायला लावला गुगलवादी नको असा सांगितलय   म्हणून तिने माझ्याकडे   हट्टच धरला…। कॉम्पुटर ची गोष्टीचा ।   तेव्हा आपल्याला किती कौतुक होत त्या आधुनिक गोष्टीच………….  लोक जवळ आली जग जवळ आला अस वाटत होत पण ते एवढ आधुनिक होऊन यंत्रच आपल्या माणसांची काळजी घेइल. आपल्या लोकांशी केव्हा  बोलायचं हे जिवंत चेहरया ऐवजी कृत्रिम रोबोट ठरवेल असा वाटल नव्हत . 
ह्या पिढीने सोयीस्कर रित्या आपली वागणूक आधुनिक केलीय पण आपलेपणा गमावलाय …। माझी आई सांगायची मामाचा गाव कस होत ते पण आता "मामा कोण असतो" हे कस सांगाव या पिढीला ……………?

No comments:

Post a Comment

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...