Wednesday 26 June 2013

माझ्यातली आदर्श गृहिणी


सकाळी सहा वाजता घड्याळीचा गझर बंद करून माझ्या दिवसाची 

सुरवात होते . अजून ५ min झोपायला मिळाल तर मजा येईल असा 

विचार करून डोळे बंद केले की  समोर असलेल्या  कामांची यादी 

डोळ्यांसमोर नाचू लागते . आणि वेळेतच उरकल पाहिजे अशी deadline 
समोर दिसल्यावर माझी मजा चांगलीच झिरते .तिथुन चालू होतो 

माझ्या दिवसभराचा न थकणारा प्रवास . सकाळच्या प्राथमिक क्रिया 

आटपून माझा स्वंपाकघरात प्रवेश होतो. अजून देवाने दोन हात द्यायला 

हवे होते ही खंत मनाला लागते . कुठल्याही कामाला २ min जास्त देण मला परवडण्यासारख नसतं .एकच वेळला  स्वंपाकघरातुन वेगवेगळे आवाज आणि वेगवेगळया चवीचे  सुंगंध दरवळू लागतात . रेडीओ मिर्चीवाला  R.J तुमचा दिवस चांगला जो म्हणून शुभेछा देत असतो. त्यावेळला मनात येत त्यापेक्षा "सगळ वेळेत होओ "ह्या शुभेछा सुद्धा चालतील . दुध ,चहा,नाश्ता आणि जेवण हे बनवून दोन घास कसेबसे कोंबले जातात . जेवण डब्यात बंद करून कॉलेजचे वेध लागतात . स्वतःला आरशात बघण्यासाठी देखील पुरेसा वेळ नसतो . जाता जाताच पेपरची ठळक बातमी वाचली जाते . आपल्या आजूबाजूला काय चाललय हे शिळ झाल्यानंतर कळतं . मोबाईल ,पर्सें ,चाबी , डबा ,घड्याळ ह्याची मनात उजळणी करून माझा ८"३ चा टोल  पडतो . नवरयाचा "सावकाश जा "असा आवाज पायरया उतरताना कानात पडतो . आणि सावकाश चालणारी माझी गाडी स्पीड घेऊन वेळेत ,१ सेकंद आधी  कॉलेजमध्ये पोहचते तेव्हा "हुश्य " असा उद्गार निघाल्याशिवाय राहत नाही . आणि मी एका पूर्णपणे वेगळ्या अशा झोन  मध्ये एन्ट्री केलेली असते . 
दिवसभरात घ्यायची lectures ,practicals ह्याची तयारी सुरु होते. राहिलेल्या वेळेत मीटिंग्स  कॉलेजची इतर कामे आणि त्याच्या deadlines सांभाळावी लागतात . एखाद्यावेळी गणितातील समीकरण बेरीज ,वजाबाकी ,गुणाकार ,भागाकार करून सोडवण सोप आहे पण आयुष्याची समीकरणं सोडवताना काय वगळायच आणि काय बाकी ठेवायचं हेच काळात नाही . परत  कॉलेजचा परीघ ओलांडून माझी गाडी घराकडे धावते . तेव्हा आठवत काल सासूबाईचा फोन आला होता , त्यांच्या माहेरची लोक जेवायला येणार आहेत संध्याकाळच्या कामांची यादी परत माझ्या डोळ्यासमोर उभी ठाकते . जातांना घेऊन जाण्याचे सामान ,भाजीपाला पिशवीत घालून दरवाजा उघडल्या जातो . तेव्हा स्वतःसाठी केलेला एक कप चहा ,मिळालेली निवांत १ ० min खूप सुखून जातात . आणि  पाहुण्यांचा पाहुणचार ,गप्पा गोष्टी आटपून माझा दिवसभराचा प्रवास १ ० च्या ठोक्याला संपतो . 
रविवारची आतुरतेने वाट बघितली जाते ,कारण त्यादिवशी वाट्याला थोडासा निवांतपणा आला असतो . आणि मग ठरतात outings ,movies ,shopping किंवा एखादी नवीन कादंबरी ,मैत्रिणीला भेटायचे plans  आणि तेवढाच काय तो विरंगुळा . 
पण मनोमन विचार येतो अस का झालाय? …………………………
अस्थिरता ,कामच प्रेशर ,आ वासून बसलेल्या डेडलाईन ,घरच्या जबाबदाऱ्या हे दृष्टचक्र गंभीर रूप घेत आहे . आणि या साऱ्याशी  अभाव आहे संवादाचा .देवसाठी दिवसातली १ ० min सुद्धा  महाग  होतात . कामाच्या रामरगाड्यात माणूसपण विसरत चाललय 
प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत असतांना ,छोट्याछोट्या गोष्टीतला आनंद मात्र महाग होत चाललाय . अचानक आलेली पावसाची सर, नुकताच उमलेलं फुल ,जुन्या आवडत्या गाण्याची धून . सहज घडू शकणाऱ्या गोष्टी अशक्य का बनल्या आहेत?
आयुष्य म्हणजे ट्राफिक जॅम ,कर्कश हॉर्नचे आवाज,खणखणलेले रस्ते,डेडलाईन ,इ एम आए चे चेक अस का झालंय ?

                                 
               

1 comment:

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...