Thursday 1 August 2013

माझ्या शब्दांच्या थैलीतून सांडलेल्या ढिगभर गोष्टी

एक कटिंग चाय ................भुरभुरणारा पाऊस ,हवेतला गारवा ,सगळीकडे पसरलेली हिरवळ गप्पांमध्ये रंगलेली तरुणाई आणि एक कटिंग चाय किती झकास combination आहे ना हे ?तुम्ही काहीही म्हणा पण चायची तलब काही औरच आहे .प्रत्येक कॉलेजच्या बाहेर एक टपरी तर असतेच ,आणि तिथला मामा म्हणजे फारच फ़ेमस कॉलेजमधील lectures मध्ये घालवलेला वेळ आठवला तर तो  फारच थोडा होता पण या टपरीवर मात्र जीवापाड प्रेम .  आयुष्यातले बरेचसे अनुभव हे इथेच  आले . कटिंग चहासोबत कितीतरी गोष्टी मित्रांनी share केल्या असतील मित्राची प्रत्येक अडचण आपली आहे आणि मी ती  सोडवण्याचा ठेका   घेतलाय या आवेशात कितीतरी अडचणी या चहासोबत गार झाल्या असतील मग ती पैश्यांची असू देत नाही तर पोरीची !नवीन मित्र जोडण्याची हीच एक जागा.  आपली पहिली भेट कुठे झाली होती रे हा प्रश्न बऱ्याच वर्षानंतर मित्राला विचारा नकळत उत्तर येत "मामाची टपरी यार………… "कोणी तिथे पहिल प्रेम यक्त केल असेल , रोज चोरून बघण्याची त्याची तगमग त्या चहासोबत यक्त झाली असेल. तिच्या डोळ्यात पाहिल्यानंतर नकळत तिच्या पापण्या हातात असलेल्या पेल्यावर स्थिरावल्या असतील . आणि मग दोघांचेही शब्द चहाच्या वाफेमध्ये विरून गेले असतील . अशा एक न अनेक आठवणी त्या कटिंग चहा सोबत जोडल्या गेल्या असतील . रात्री उशिरापर्यंत जागून लिहिलेले journals आणि PL मध्ये हटकून येणारी झोप हे घालवण्यासठी टपरीच्या कितीदा तरी वाऱ्या झाल्या असतील . कुठलही celebration हे चहानीच करायचं हा तर जणू अधोरेखित नियमच . तिथे बसून तासान तास निघून जायचा पण lecture मधला एक मिनिट  एका तासास्रखा जड जातो . प्रत्येकाच्या जीवनात चहासोबत आठवणाऱ्या आठवणी असतीलच . आणि ह्या मामांची चहा बनवायची पद्धतही खूप वेगळी असते भट्ट्याचा यज्ञ पेटवल्यावर साखर चहा आणि दूध याची आहुती टाकली जाते . अद्रकाचा सुगंध दरवळतो आणि चहाचे पातेले वर  करून ते धार कपात सोडली जाते आणि हे सगळं एका लयीत चाललं असत ... चहाला गरीब श्रीमंतीचा भेद नाही ज्या प्रकारे तो गरीबाच्या झोपडीत कमी दूध घालून बनतो त्याचप्रमाणे तो high क्लास लोकांमध्ये सुद्धा काचेच्या कपातून सर्व्ह होतो. चहाला वेळ नसते ... तो दिवसाला कधीही चालतो ...फक्त दोन पेक्षा जास्त वेळ झाला की "तुम्ही तुमचा करून घ्या आता "अस ऐकायला मिळत . मित्रांसोबत घेतलेला चहा ... आनंदी तर मैत्रीणीसोबत घेतलेला चहा एक एक घोट नजरेत बघत ,आणि मीटिंग मध्ये बॉस सोबत घेतलेला चहा आता या कामासाठी माझ्याकडे पाहू नये म्हणून तोंड लपवण्यासाठी तर मशीनचा चहा ऑफिसमधला वेळ घालवण्यासाठी असतो .कॉलेज मध्ये कोणी फुकट चहा पाजत असेल तर मित्रांची झुंबड निघते . रेल्वे मध्ये फिरणारे फेरीवाले चाययय  ssss या आवाजांनी स्टेशन आलाय हे कळतं .सर्दी खोकल्यावर घेतला जाणारा रामबाण उपाय म्हणजे गवती चहा. 

पुण्यात लिहलेलं वाक्य आठवत "चहाला वेळ नसते ,पण वेळेवर चहा लागतो "


भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...