Tuesday 19 November 2013

निसर्गाचं आणि त्यासोबत समाजाचं बदलत रूप …………….

लहानपणी शाळेत शिकवलेले तीन ऋतू आठवतात . उन्हाळा, हिवाळा ,पावसाळा त्यापैकी प्रत्येक ऋतू हा चार महिने असायचा आणि प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत होती . त्यातला उन्हाळा म्हणजे कडक उन्ह दुपारी घराच्या बाहेर निघायचं नाही ,पण शाळेला लागलेल्या सुट्या ,घरात जमलेले भावंड त्यांच्यासोबत मांडलेले पत्यांचे डाव , थंडगार कैरीचे पन्हे ,आंब्याचा केशरी रस,आजीची कुरोड्या पापडाची लगबग ,संध्याकाळी अंगणात पाणी टाकल्यावर येणाऱ्या वाफा हे सगळ छान  चित्र उन्हाळा म्हटला की डोळ्यासमोर उभं राहतं . पण माणसाच्या लालची आणि हेखेखोर स्वभावामुळे निसर्गाच सगळच चित्र पालटल्या सारख दिसतय . आता यंदाच्या उन्हाळा तर जणू सुर्य आग ओकतोय  शाळेला सुट्या लागल्या तरी लहान मुलं कुठल्यातरी उन्हाळी शिबिराला गळ्यात bag अडकून जातांना दिसताय .एकच मुल घरात असल्यामुळे भावंडासोबत केलेली सुट्टीची मजा लोप पावतेय . आंब्याचा रस किंवा कैरीचे पन्हे हल्ली पैसे फेकल्यावर बाराही महिने मिळतात त्यामुळे खास उन्हाळ्याची वाट पहावी लागत नाही . माणसाने स्वतःच आयुष्य सोयीच करून घेतलय खर पण छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद मात्र नक्कीच गमावलाय .
   
हिवाळ्याचही तसच ,यंदा पाउस आला वेळेवर पण त्याचा मुक्काम लांबला त्यामुळे दिवाळीची गुलाबी थंडीही पावसाखाली जाईल कि काय अशी शंका होती . ही  निसर्गाची अस्थिरता वाढतच चाललीय त्यामुळे जगाची आर्थिक ,राजकीय,सामाजीक परिस्थिती बदलतेय . दिवाळीतला सगळा उत्साह हा वाढलेल्या महागाईने ,प्रदूषणाने ,लोकांच्या विचारातील संकुचितता त्यामुळे उदासीन वाटत होता .अगदीच कसा  दमट दमट!घराघरातून येणारे चिवडा चकल्याचे  सुगंध बाजाराच्या रेडीमेड डब्यामध्ये बंद झालेत . दिव्यांची केलेली रोषणाई देखील आपल्याच घरापुरती मर्यादित होती त्यामुळे आसमंत उजळून निघाला हे वाक्य आजीच्या तोंडीच राहिलंय . सगळच बाजारीकरण झाल्यामुळे आनंदाच माप देखील कमी झालाय!
  

   
पावसा वरही काही बोलायला नको. हवीहवीशी वाटणारी पावसाची रिमझिम कधी उग्र रूप धारण करेल आणि सर्वस्व हिसाकावेल याचा नेम नाही . नुकताच केदारनाथला झालेलं नुकसान त्याच पाणी अजूनही डोळ्यातून गेलेल नाही .       
       
पण म्हणून  काय जगण सोडलेलं नाही . हेही दिवस जातील ,संकटाचे ढग दूर होतील आणि परत तसच हिवाळ्यातील गुलाबी थंडीला झाकत स्वच्छ सोनपिवळ उन्ह पडेल . पावसाळ्यातील गारवा परत सगळ्यांच्या थकलेल्या मनाला ताजतवान करेल . 
महत्वाच हेच कि मधल्या प्रवासात न थकता न कंटाळता उजाडण्याची वाट पाहण !आणि नक्की उजाडणार ह्याची खात्री बाळगण !

2 comments:

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...