Wednesday 27 November 2013

मुलांमध्ये फरक पडतोय ……. नक्कीच!

मुलांवर चांगले संस्कार करण्याचा अट्टाहास आजीने चालू केला होता . आई बाबा दोघेही नोकरी करत असल्यामुळे "तुम्हाला मुलांना चांगले वळण लावता येत नाही " असे आजीने आल्यापासून कित्येकदा तरी ऐकवले होते. आजपासून मुलांना वळण लावण्याची जबाबदारी माझी अस म्हणून आजी पदर खोचून लगेच कामाला लागल्या . या एका महिन्यात मी सगळ्या घरातले डबे , बरण्या , ताट ,चमचे , वाटी ,पेले , चादरी , कपाट ,झाडं , कुंड्या ,माणसं आणि ,मुले ह्या सगळ्यांना चकचकीत करून सोडेल असे आजीने ठरवलेले आहे त्यामुळे आई आणि बाबांनी केवळ बघ्याची भूमिका घ्यायची आणि दुरूनच गंमत  पहावी असा निश्चय करण्याचे धाडस केले.

पहाटेपासूनच आजीची स्वयंपाकघरात लगबग चालू झाली . थालीपीठ आणि दह्याची चटणी ह्याचा नाश्त्यासाठी बेत केला होता पण आईची कुठलीही मदत मला नकोय आणि माझ्या  स्वयंपाक करण्याचा वेग हे पटवून देण्यामध्ये बाबांच्या ऑफिसची आणि मुलांच्या स्कूल बसची वेळ झाली शेवटी पोह्यांवर समाधान मानून आई बाबा ऑफिसला आणि मुल शाळेसाठी बाहेर पडली . पण आजी पण   हार मानणाऱ्यापैकी   नव्हती . मुलांना शाळेतून आल्यावर तरी खायला मिळेल म्हणून आजीनी सगळ्या भाज्यांचं थालीपीठ  केलच , आल्यावर अस थालीपीठ कधीच खायला मिळाल नाही अस म्हणून मुल कशी हुरळून जातील ह्याचा विचार आजी मनात करू लागली . जेवणानंतर आपण ह्यांना कुठली गोष्ट सांगायची सोनपरी , माकड आणि टोपीवाला कि भोपळा आणि म्हातारी ,आवडती नावडती राणी अशा वेगवेगळ्या गोष्ट्यांची जुळवाजुळव आजीनी चालू केली . मुल छान  गालावर हात टेकून गोष्ट ऐकत आहे आणि तिकडल्या (आईच्या माहेरच्या ) आजीपेक्षा तू किती छान  छान  गोष्टी सांगते म्हणून "परत सांग ना " म्हणून छडा लावत आहे अश्या रम्य कल्पना आजीनी स्वतःशीच केल्या,  मुल शाळेतून परतली , सगळ आवरून जेवणाच्या टेबलवर आली ,  आजीने दोघांनाही गरम गरम थालीपीठ करून वाढले , "ए आजी हे तर पिझ्झा सारखच लागतंय डॉमिनोझ    आणि पिझ्झा हट मध्ये मिळतो अगदी तसाच तिथे तर त्याच्यासोबत कोक पण फ्री देतात पण तुला spongy करता आला नाही " अस म्हणून मुलांनी समोरचा पिझ्झा संपवला . आजीला एवढ्या मेह्नीतेने केलेल्या थालीपीठाला पिझ्झा म्हणावं हे काही फारस रुचल नाही !
 
टी व्ही समोरचा रीमोट घेऊन दोघेही सोफ्यावर आडवी झाली , पण तुम्हाला गोष्ट सांगते म्हणून मुल नको नको म्हणत असताना देखील आजीने दोन्ही कार्ट्यांना टी व्ही बंद करायला लावला . कारण ह्या पोरांना वळण आपणच लावू शकतो असा आजींचा (गैर )समज होता . 
" कुठली गोष्ट ऐकायची?  "     आजीचा प्रश्न   
" डोरेमोन $$$$ "                मुल ओरडली . 



आजी :"हा कोण?  " अस मनात म्हणून आणि मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष्य करून आजीने "म्हातारी आणि भोपळा " ची गोष्ट सांगायला सुरवात केली . 
"एका म्हातारीला लेकीला भेटायला जायचं होत .वाटेत खूप घनदाट जंगल होत . जंगलात वाघ , कोल्हा ,तरस असे प्राणी रहात होते , म्हणून आजीने एक मोठा भोपळा घेतला आणि त्यात बसली भोपळ्याला म्हणाली "लेकीकडे जाईन तूप रोटी खाईल … चल रे भोपळ्या टुणूक टुणूक "    आजी
"काहीपण काय आजी …! त्यापेक्षा जीप्सीने गेली असती म्हातारी त लवकर पोहचली असती आम्ही ट्रीपला गेलो तेव्हा जिप्सीतून फिरलो वाघ पाहायला  …. इई भोपळ्यात काय बसून जायचं ! "मुलांनी आजीला चूप केल आणि Tom & Jerry बघू लागले  

संध्याकाळी आई बाबा घरी आले , दुसरया दिवशी मुलांच्या शाळेत पालकसभा होती म्हणून आईने सुट्टी घेतली होती, पण "मी जाते मुलांच्या शाळेत, बघते शिक्षकांना तरी जमत का मुलांना वळण लावायला "असा पवित्रा आजीने घेतल्यामुळे आईला सुट्टी रद्द करावी लागली आणि पालकसभेत आजीची हजेरी लागली . "गणितातले प्रोब्लेम सोडवण्याच्या tricks , ईग्रजी बोलण सुधारण्याकरिता क्लास्सेस ची यादी , मुलांची personality development  असे अनेक अगम्य विषयाची चर्चा झाल्यावर पालकसभा संपली . "आमच्या वेळी नव्हत बाई असलं काही ……………। " असा उद्गार काढून आजी परतल्या  .
एका महिन्यात आपण कस सगळ चकचकीत करून दाखवतो म्हणून आजीने माळ्यावरचे डब्बे धुवायला काढले ,आणि स्टुलावरून पाय घसरला ! हाय हाय ………… असा उद्गार काढून आजी मटकन खालीच बसल्या . आई बाबांनी तातडीने आजीला डॉक्टरकडे नेल . पायाला प्लास्टर लागल होत दोघांनीही सुट्टी काढून आजीची सेवा केली ,आता गोष्ट ऐकायची वेळ आजीवर आली होती , मुलांनी पण दोरेमोन ,स्पायडर म्यन च्या गोष्टी सांगून आजीची करमणूक केली . 
तेव्हामात्र आजीला  आजोबांचे वाक्य आठवल्याशिवाय राहिले नाही " तू खूप दिवसांनी  पोराकडे जातेय त्यांच्या संसारामध्ये उगाच लुडबुड करू नको , आपली पिढी आणि त्यांची पिढी ह्यामध्ये बराच फरक पडलाय , ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे त्यांना परिस्तिथी ने बद्वालय , आपल्याला जर त्यांच्याशी जुळवून घ्याच असेल तर बदल आपल्यात करावा लागेल वळण आपल्याला बदलाव लागेल "
असा विचार करून आजी मुलांसोबत tom & jerry च्या fights एन्जोय करू लागल्या    

No comments:

Post a Comment

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...