Monday, 29 May 2017

उत्स्फूर्त जगायला शिका ……….


सगळ्या ताणतणावात उत्स्फूर्तता जिवंत ठेवण हा एकट पडण्यापासून टाळण्यासाठी ,निराशा दूर ठेवण्यासाठी फार महत्वाचा उपाय आहे अगदि छोट्या  छोट्या गोष्टी पण आपण खूप आखीव रेखीव चौकटी प्रमाणे करायला जातो आणि त्याची सहजताच गमावतो आपण उच्च पदावर काम करतो म्हणजे मोठ्याने हसता येत नाही ,गाण गुणगुणता येत नाही रस्त्यावर उभ राहून शेगदाणे तोंडात टाकता येत नाही jokes मारून हसता  येत नाही हे कोणी ठरवलं?तुम्ही आम्हीच न ?मग आपणच शिकायला हव ह्या सगळ्यातून बाहेर पडायला..... काय म्हणता?काही गोष्टी जर सहज घडत असतील तर त्या इतक्या सहज घडल्याचं कशा ?हा प्रश्न समोर उभा राहतो.आपण आपला आनंद हा कृत्रिम गोष्टींमध्ये जास्त शोधतो. ज्या झकपक दिसतात आणि पैसे खर्च करून मिळतात. प्रत्येक वीकएंड कुठे घालवायचा ह्याचे नियोजन आधीच सुरु होते . मग कुठेतरी दुसऱ्याच ऐकून  sight seeing ला जातो आणि काहीतरी थातुर मातुर बघून वेळ आणि पैसा खर्च करून येतो ,आणि आजकाल मॉलचे फॅड खूपच वाढले आहे तिथला कृत्रिमपणाचं प्रदर्शन पाहून कंटाळा यायला लागतो .रोज काय घेणार तिथून?पण तिथल्या झकाकी वर आपण मोहून जातो .याउलट नैसर्गिग गोष्टींचा शोध आपण घेऊ शकत नाही ज्या सहज मिळतात त्या गोष्टींकडे आपले लक्षच जात नाही .सुंदर वाऱ्याची झुळूक,मोगऱ्याच्या फुलांचा सुंगंध,एखादी आवडती गाण्याची धून , मित्रांसोबत मारलेल्या गप्पा,भावंडांसोबत घालवलेल्या सुट्या,दुपारी हात पाय पसरून काढलेली झोप,ह्या सहज मिळणाऱ्या गोष्टी महाग झाल्या आहेत.  

आयुष्य सगळं कृत्रिमतेणे व्यापलंय ,कुणाकडेही जायचं म्हटलं तरी आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. सहज साधं सोपं अस काही राहीलच नाही . तुमचे कपडे सुद्धा तुम्हाला तुमच्या स्टेटस ला साजेसेच घालावे लागतात , तुम्हाला बोलताना सुद्धा उधार आणलेली इंग्रजी भाषाच वापरावी लागते ,ज्यानी समोरच्यावर छाप पडेल .एखाद्या संथ नदीला बघितलं तर दुरून त्याच्या गहिरेपणाची अनुभूती येणार नाही पण त्यामध्ये पाय टाकल्यावर लक्षात येईल नदीची खोली खूप आहे. आणि खळखळ आवाज करून वाहणाऱ्या नदीला बघितलं तर दुरून वाटेल नदी खूप खोल आहे पण मुळात खोली नसून तो फक्त खळखळाट असतो. असच असत आपलाही  जो जास्त प्रदर्शन करायला जातो मुळात तिथे काहीच नसतं ,तो फक्त कृत्रिम दिखावा असतो. आपण   आपल्या मध्ये कधी झाकूनच पाहत नाही लोकांचं बघून,लोकांसाठी जगतो. माणसाची सादगी ,साधेपणा त्याच्या अंतरंगाची ओळख करून देऊ  शकते . शेवटी खोटा मुखवटा किती दिवस टिकणार?तो कधीनाकधी फाटणारच पण जे शाश्वत आहे ते कायमस्वरूपी राहील त्याला प्रदर्शनाची गरज नसते . 

Wednesday, 17 May 2017

मी आणि स्वयंपाकघर .....


 बाईचे  आणि स्वयंपाकघराचे नाते  हे  कितीतरी प्रकारचे असू शकतात, कोणाचं नातं हे कामापुरते असेल ,कुणाचे  सुट्टीच्या दिवसांपुरते मर्यादित ,कुणाचे रोजचे जिवाभावाचे घट्ट ..... माझं नातं तिसऱ्या प्रकारात मोडतं . मुळातच "खावे तर चवीने ,जगावे तर मानाने "ह्या वळणावर सरळ चालणारी मी . सकाळच्या चहाचा  स्वादसुद्धा कसा दरवळला पाहिजे आणि त्याच्या वाफेसोबत आपला  दिवसही प्रसन्न असायला पाहिजे . जोडीला गरम गरम   पोहे ,त्यावर खुलून दिसणारी हिरवी कोथिंबीर आणि बाजूला डोकावणारी लिंबूची फोड जेव्हा समोर येते तेव्हा सुटणारे पोट ,सुरु असलेले डाएटिंग ,ह्याचा विसर पडतो. हे   समीकरण म्हणजे लग्ग्न जुळवून आणि नंतर टिकवून ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडते. मुलगी पसंत नव्हती पण पोहे आणि चहा ह्याच्या चवीला बघून हो म्हणालो बर का!!त्यावरून तू उत्तम गृहिणी पण असशील हे ओळखलं म्हणून लग्ग्न केलं ..... इति नखरे असलेले आमचे नवरे . मुळातच मला हॉटेल मध्ये जाऊन किंवा मागवून जेवणे हे पटत नाही. तिथली बाहेरची चकाकी सोडली तर आतमधली चकाकीवर न बोललेले बरे शिवाय पैसे फेकून मागवले अन्न हे कुठल्या भावनेने बनवले असणार ? पण आम्ही मात्र आमचं स्टेटस सिम्बॉल जपून ठेव ण्यासाठी महागड्या हॉटेल मध्ये जातोच ,तिथलं टोमॅटो सूप ओरपून , ... आईच्या हातची चव नाही बाबा अस म्हणत वीकएंड साजरा करतो. कशी असणार ??पदर खोचून ,सकाळपासून राबून ,प्रेमाने ,आनंदाने बनवलेले साधे वरण ,भात ,भाजी ,पोळीचे जेवण सुद्धा भुकेच्या वेळेच्या आधीच समोर  येते त्याची किंमत नाही मोजता येणार ,हॉटेलच्या जेवणाची सर देखील नाही येणार . घरी आलेला पाहुणा तोही माहेरचा असेल तर मग विचारायलाच नको (खरं असेलही कदाचित .... नवऱ्याची टिपणी )स्वयंपाकघरातुन येणारे आवाज ,सुगंध हे रोजच्यापेक्षा वेगळे येतात . आणि आलेला पाहुणा हा खाण्यासाठीच आलेला होता अस वाटायला लागत कारण आहेच तस ..... वरणाची फोडणी हि जादाची हिंग,कढीपत्ता ,कोकम आमसूल घालून केलेली असते, चवीला रोजची कोशिंबीर  असतेच पण सोबत तीन रंगाच्या वेगवेगळ्या चटन्या हि  असतात , लोणच्याची जुनी भरणी निघाली असते त्याबरोबरच काजू पेरलेला शिरा ,तूप मोकळ्या हाताने सोडलेली गरम पोळी, मऊ भात ,आंब्याच्या रसाची वाटी चारोळी घालून सजवली असते. दुपारचा खमंग चिवडा ,भेळ ,    आ इसक्रीम ,संध्याकाळी चायनीज ,साऊथ  इंडियन .... घर बसल्या हॉटेल चे मेनू मिळतात ... जीवन फक्त खाण्यासाठीच आहे ... आणि ते खरंच सुंदर आहे. हा आभास होतो . 
नवीन लग्न होऊन घरी आली तेव्हा आपल्याला स्वयंपाकघराचा ताबा मिळणारच नाही अस वाटत होते कारण एक सुगरण हात तिथे असतांना माझे काम फक्त भाजी वाणवणे ,कणिक मळणे ,पाणी भरणे एवढेच होते पण हळू हळू तो सुगरणपणाचा वारसा सुनेकडे सोपवून त्या निवृत्त कधी झाल्या हे कळलेच नाही . पण मला अजूनही त्यांची नजर इकडेच आहे अस वाटत म्हणून कि काय स्वयंपाक अजून रुचकर होतो. रेसिपी वाचून आपल्याला मीठ ,तेल टाकता येऊ शकत पण साखरेचा दोन तारी आणि गुळाचा एक तरी पाक ओळखायला ,भाजी करपायचा वास ओळखायला अनुभवाचे बोल लागतात . आमच्या दोघींच्या भांड्याचा आवाज हा कधी वाढलाच नाही. तो कायम एकमेकांना सांभाळत येत आहे ... त्यामुळे पदार्थांचे  दरवाळणारे सुगंध हे अजूनही  येत राहतात .तसेच भाजिला जास्त झालेलं तिखट ,कमी पडलेलं मीठ हे कधीही आमची चव घालवत नाही . 

   Mom's kitchen open for 24 hours 
Image result for  kitchen watches

Tuesday, 2 May 2017

एक आगळा वेगळा वाढदिवस

आम्ही दोघही मुलाचा वाढदिवस  कसा grant करता येईल याचं  नियोजन करत होतो . पंच तारांकित हॉटेल्स  याची यादी काढायला  सुरवात केली ,त्यानंतर  मेनु काय काय असावे ?मित्र  ,आप्त  मंडळी ,नातेवाईक मुलाचे मित्र अशी भली मोठी यादी तयार झाली . जवळपास एक महिना अगोदर हा वाढदिवस special  कसा करायचा याचेच विचार मनात चालू होते. हातात खेळणा रा पैसा ,मित्रांमध्ये दाखवता यावी अशी श्रीमंती आणि मुलाच कौतुक या सगळ्यांचे  खूप मोठे नियोजन करण्यामध्ये आमचा वेळ जाऊ लागला . ज्याच्यासाठी  हे  नियोजन चालल होत तो मात्र या सगळ्यापासून अनभिज्ञ  होता फक्त आपले आई बाबा आपल्याला वेळ देत नाही म्हणून त्याची चिडचिड चालली होती . माझा मुलगा सक्षम वय वर्ष २. सगळ नियोजन एकदम  छान  झालाय म्हणून आम्ही दोघही शांत झोपलो . आमंत्रण पाठवून झाले. पण त्या दिवशी कॉलेजला  अचानक लवकर सुटटी मिळाली .लवकर घरी जावं आणि राहिलेली तयारी पूर्ण करावी या विचारात गाडीचा वेग वाढवला ,पण गाडीचा चक्का जॅम ..... हुश्श !!!आता एक तास त्यामध्ये जाणार होता गाडी दुकानदाराकडे सोपवून वेळ कोठे घालवावा असा विचार करत होते. रस्त्यामध्ये मातोश्री  अनाथाश्रम आणि वृद्धश्रम मला रोज जाता येता दिसायचे पण जायचं धाडस कधी झालं नाही...

Image result for matoshri vrudhashram pune

आज गाडी बंद पडण्याचं निमित्त मिळालं . मी फक्त आतमध्ये डोकावून बघावं म्हणून कोणालाही दिसणार नाही अशा आडोशाला उभे होते साधारण  वयोगट ३ वर्षांपासून पुढील वयाची मुले आणि मुली असतील . आई बाबा नाही म्हणून किंवा घरची परिस्थिती गरीब म्हणून काही शिक्षण मिळतंय म्हणून तिथे आली असावी . कुढलाही दुःख ना कुर्वाळता ते मुले स्वच्छंद बागडत होती . हसत होती खेळत होती , मनात विचार आला ह्यांचा  वाढदिवस ठाऊक असेल का कोणाला?आपण उच्च सोसायटीतील लोक म्हणून आपल्याला पैसा खर्च करायचा आहे ,श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं आहे म्हणून हे सगळं जमतंय . त्यांना ज्या दिवशी चांगलं जेवायला मिळेल ,चांगले कपडे घालायला मिळतील हेच त्यांचं सेलिब्रेशन .... हे लहान मुले ह्या जगाच्या डावपेचांपासून खूप दूर आहे माझा सक्षम काय किंवा हे लहान मुले काय.... गरीब ,श्रीमंत ,हा भाव अजून त्यांच्यापर्यंत पोचलाच नाही. आपल्याला खेळण्याचं स्वातंत्र्य आहे दोन वेळेस जेवायला मिळतंय हे त्यांच्यासाठी खूप आहे!!!
तेव्हाच ठरवलं आपण सेलेब्रेशन तर नेहमीच करतो .... दोन शब्द कौतुक करून लोक निघून जातील.... पण तो आनंद फक्त क्षणभर असेल.. आपण सक्षमचा वाढदिवस ह्या मुलांबरोबर साजरा करूया... अस मनाशी पक्क करून निघाले. ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना venue बदल झाल्याचा फोन केला आणि सगळ्यांना मातोश्रीला या म्हणून सांगीतले . बरेच लोक venue ऐकून आलेच नाही काही प्रेमापोटी आली काही चांगलं वाटणार नाही म्हणून हजेरी लावायला आली .... पण लोकांचा विचार बाजूला ठेवला तर सगळ्यात जास्त एन्जॉय केलं ते सक्षमने त्याला त्याच्या वयाचे मुले दिसले जे नेहमी दिसणारे नव्हते ... त्यांचे खेळ ,त्यांचे बोलणे उगाच इंग्लिशचा आव आणणारे नव्हते . तिथे संध्याकाळी जमणाऱ्या आजी आजोबांसोबत गप्पा मारल्या आणि सगळ्यांसोबत "वदनी कवळ घेता " म्हणता म्हणता तो घास अधिकच गोड  वाटू लागला . हे मात्र नक्की उल्लेखनीय आहे तिथे आमंत्रित लोकांच्या बच्चे कंपनीने मात्र खरंच एन्जॉय केलं.. आणि आम्हाला मिळालं समाधान एक वेगळा वाढदिवस साजरा  केल्याचा  .... 
Image result for matoshri vrudhashram puneImage result for matoshri vrudhashram pune


Wednesday, 19 February 2014

सप्त पदी मी रोज चालते ......

सप्त पदी मी  रोज चालते ......


तुझ्या सवे हे शतजन्मीचे हो माझे नाते......"


लग्नानंतरचे सगळच  गूढ दडलाय ह्या दोन वाक्यात ..सात पावल टाकताना प्रत्येक पावलावर घेतलेली शपथ देवाला साक्षी मानूनहजारो लोकांच्या अक्षतांच्या सहायाने "लग्न"हा मंगल सोहळा पार पडतो.आणि प्रत्येक मुलीच्या   आयुष्यातला हा turning  point ठरतो.love  marriage असू दे किंवा arrange  marriage एका मराठी मुलीला धाकधूक हे वाटतेच,कारण तिच्यावर असलेला संस्काराचा पगडा.आजीकडून,आईकडून नकळत  "मुलीची जात"हे कितीदा तरी ऐकलेल असतं .आतापर्यंत जुळवत आणलेल्या नात्यांना स्वल्पविराम द्यायचा असतो.आणि पुढची नवीन स्वप्ने ,नवीन लोक,नवीन नाती,नवीन पद्धती हे सगळ आपलास करून करून चालू करायचा असतो नवीन प्रवास..........
एक एक काडी  जमा करून चिमणा चिमणी घरट बांधायला चालू करतात... काही क्षणासाठी असलेल भांडण ...काही क्षणांना केलेली तडजोड , ,न बोलता एकेमेकांना कळलेली भाषा ,रोजचच असला तरी वाट पाहणं ,कोणाची तरी सून ,मामीवाहिनी,काकू  ,बायको ह्या नात्यांची सांगड घालावी लागते.येणारा प्रत्येक क्षण हा नवीनच असतो.आतापर्यंत आईचा सेकंड hand  असणारीला जेव्हा पुरण पोळी स्वत: करण्याची वेळ आल्यावर  तारांबळ उडते.पुरणपोळी करायला घेतलेले कष्ट आणि जमल्यावर होणारा आनंद हा अवर्णनीय असतो."अरे संसार संसार जसा तवा  चुल्यावर ,आधी हाताला चटके मग मिळते  भाकर " हे बहिना बाईंचे वाक्य आजकालच्या मुली'ना  काही वेगळ्या प्रकारे लागू पडत."अरे स्वयांपक  स्वयांपक जमला तर ठीक नाही तर चल हॉटेलवर  "
  भाजी कुठली करायची त्या प्रश्नापासून ते चुलत दिराच्या लग्नात साडी कुठली घालायची ,पुढच्या आठवड्यात येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई हे management  कस करायचंह्याच उत्तर शोधण्यात दिवसातला बराच वेळ खर्ची पडतो.घरात असतांना आईने दिलेल्या  हाकेला नक्की काहीतरी काम असेल ,म्हणून उशिरा  आवज देणारी मी ,मैत्रिणींसोबत jeans, T -shirt  घालून पुणे पालथ घालणारी मी,आता उत्कृष्ट रित्या स्वयांपाक्क्घर सांभाळू शकते.हा झालेला बदल मलाच माझा नवीन आहे..........


(ता .क ):-लग्नाला पूर्ण झालेल एक वर्ष आणि माझ्यात झालेला बदल ,मागे वळून बघतांना सुचलेला हा Blog !) 
  


Wednesday, 27 November 2013

मुलांमध्ये फरक पडतोय ……. नक्कीच!

मुलांवर चांगले संस्कार करण्याचा अट्टाहास आजीने चालू केला होता . आई बाबा दोघेही नोकरी करत असल्यामुळे "तुम्हाला मुलांना चांगले वळण लावता येत नाही " असे आजीने आल्यापासून कित्येकदा तरी ऐकवले होते. आजपासून मुलांना वळण लावण्याची जबाबदारी माझी अस म्हणून आजी पदर खोचून लगेच कामाला लागल्या . या एका महिन्यात मी सगळ्या घरातले डबे , बरण्या , ताट ,चमचे , वाटी ,पेले , चादरी , कपाट ,झाडं , कुंड्या ,माणसं आणि ,मुले ह्या सगळ्यांना चकचकीत करून सोडेल असे आजीने ठरवलेले आहे त्यामुळे आई आणि बाबांनी केवळ बघ्याची भूमिका घ्यायची आणि दुरूनच गंमत  पहावी असा निश्चय करण्याचे धाडस केले.

पहाटेपासूनच आजीची स्वयंपाकघरात लगबग चालू झाली . थालीपीठ आणि दह्याची चटणी ह्याचा नाश्त्यासाठी बेत केला होता पण आईची कुठलीही मदत मला नकोय आणि माझ्या  स्वयंपाक करण्याचा वेग हे पटवून देण्यामध्ये बाबांच्या ऑफिसची आणि मुलांच्या स्कूल बसची वेळ झाली शेवटी पोह्यांवर समाधान मानून आई बाबा ऑफिसला आणि मुल शाळेसाठी बाहेर पडली . पण आजी पण   हार मानणाऱ्यापैकी   नव्हती . मुलांना शाळेतून आल्यावर तरी खायला मिळेल म्हणून आजीनी सगळ्या भाज्यांचं थालीपीठ  केलच , आल्यावर अस थालीपीठ कधीच खायला मिळाल नाही अस म्हणून मुल कशी हुरळून जातील ह्याचा विचार आजी मनात करू लागली . जेवणानंतर आपण ह्यांना कुठली गोष्ट सांगायची सोनपरी , माकड आणि टोपीवाला कि भोपळा आणि म्हातारी ,आवडती नावडती राणी अशा वेगवेगळ्या गोष्ट्यांची जुळवाजुळव आजीनी चालू केली . मुल छान  गालावर हात टेकून गोष्ट ऐकत आहे आणि तिकडल्या (आईच्या माहेरच्या ) आजीपेक्षा तू किती छान  छान  गोष्टी सांगते म्हणून "परत सांग ना " म्हणून छडा लावत आहे अश्या रम्य कल्पना आजीनी स्वतःशीच केल्या,  मुल शाळेतून परतली , सगळ आवरून जेवणाच्या टेबलवर आली ,  आजीने दोघांनाही गरम गरम थालीपीठ करून वाढले , "ए आजी हे तर पिझ्झा सारखच लागतंय डॉमिनोझ    आणि पिझ्झा हट मध्ये मिळतो अगदी तसाच तिथे तर त्याच्यासोबत कोक पण फ्री देतात पण तुला spongy करता आला नाही " अस म्हणून मुलांनी समोरचा पिझ्झा संपवला . आजीला एवढ्या मेह्नीतेने केलेल्या थालीपीठाला पिझ्झा म्हणावं हे काही फारस रुचल नाही !
 
टी व्ही समोरचा रीमोट घेऊन दोघेही सोफ्यावर आडवी झाली , पण तुम्हाला गोष्ट सांगते म्हणून मुल नको नको म्हणत असताना देखील आजीने दोन्ही कार्ट्यांना टी व्ही बंद करायला लावला . कारण ह्या पोरांना वळण आपणच लावू शकतो असा आजींचा (गैर )समज होता . 
" कुठली गोष्ट ऐकायची?  "     आजीचा प्रश्न   
" डोरेमोन $$$$ "                मुल ओरडली . 



आजी :"हा कोण?  " अस मनात म्हणून आणि मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष्य करून आजीने "म्हातारी आणि भोपळा " ची गोष्ट सांगायला सुरवात केली . 
"एका म्हातारीला लेकीला भेटायला जायचं होत .वाटेत खूप घनदाट जंगल होत . जंगलात वाघ , कोल्हा ,तरस असे प्राणी रहात होते , म्हणून आजीने एक मोठा भोपळा घेतला आणि त्यात बसली भोपळ्याला म्हणाली "लेकीकडे जाईन तूप रोटी खाईल … चल रे भोपळ्या टुणूक टुणूक "    आजी
"काहीपण काय आजी …! त्यापेक्षा जीप्सीने गेली असती म्हातारी त लवकर पोहचली असती आम्ही ट्रीपला गेलो तेव्हा जिप्सीतून फिरलो वाघ पाहायला  …. इई भोपळ्यात काय बसून जायचं ! "मुलांनी आजीला चूप केल आणि Tom & Jerry बघू लागले  

संध्याकाळी आई बाबा घरी आले , दुसरया दिवशी मुलांच्या शाळेत पालकसभा होती म्हणून आईने सुट्टी घेतली होती, पण "मी जाते मुलांच्या शाळेत, बघते शिक्षकांना तरी जमत का मुलांना वळण लावायला "असा पवित्रा आजीने घेतल्यामुळे आईला सुट्टी रद्द करावी लागली आणि पालकसभेत आजीची हजेरी लागली . "गणितातले प्रोब्लेम सोडवण्याच्या tricks , ईग्रजी बोलण सुधारण्याकरिता क्लास्सेस ची यादी , मुलांची personality development  असे अनेक अगम्य विषयाची चर्चा झाल्यावर पालकसभा संपली . "आमच्या वेळी नव्हत बाई असलं काही ……………। " असा उद्गार काढून आजी परतल्या  .
एका महिन्यात आपण कस सगळ चकचकीत करून दाखवतो म्हणून आजीने माळ्यावरचे डब्बे धुवायला काढले ,आणि स्टुलावरून पाय घसरला ! हाय हाय ………… असा उद्गार काढून आजी मटकन खालीच बसल्या . आई बाबांनी तातडीने आजीला डॉक्टरकडे नेल . पायाला प्लास्टर लागल होत दोघांनीही सुट्टी काढून आजीची सेवा केली ,आता गोष्ट ऐकायची वेळ आजीवर आली होती , मुलांनी पण दोरेमोन ,स्पायडर म्यन च्या गोष्टी सांगून आजीची करमणूक केली . 
तेव्हामात्र आजीला  आजोबांचे वाक्य आठवल्याशिवाय राहिले नाही " तू खूप दिवसांनी  पोराकडे जातेय त्यांच्या संसारामध्ये उगाच लुडबुड करू नको , आपली पिढी आणि त्यांची पिढी ह्यामध्ये बराच फरक पडलाय , ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे त्यांना परिस्तिथी ने बद्वालय , आपल्याला जर त्यांच्याशी जुळवून घ्याच असेल तर बदल आपल्यात करावा लागेल वळण आपल्याला बदलाव लागेल "
असा विचार करून आजी मुलांसोबत tom & jerry च्या fights एन्जोय करू लागल्या    

Tuesday, 19 November 2013

निसर्गाचं आणि त्यासोबत समाजाचं बदलत रूप …………….

लहानपणी शाळेत शिकवलेले तीन ऋतू आठवतात . उन्हाळा, हिवाळा ,पावसाळा त्यापैकी प्रत्येक ऋतू हा चार महिने असायचा आणि प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत होती . त्यातला उन्हाळा म्हणजे कडक उन्ह दुपारी घराच्या बाहेर निघायचं नाही ,पण शाळेला लागलेल्या सुट्या ,घरात जमलेले भावंड त्यांच्यासोबत मांडलेले पत्यांचे डाव , थंडगार कैरीचे पन्हे ,आंब्याचा केशरी रस,आजीची कुरोड्या पापडाची लगबग ,संध्याकाळी अंगणात पाणी टाकल्यावर येणाऱ्या वाफा हे सगळ छान  चित्र उन्हाळा म्हटला की डोळ्यासमोर उभं राहतं . पण माणसाच्या लालची आणि हेखेखोर स्वभावामुळे निसर्गाच सगळच चित्र पालटल्या सारख दिसतय . आता यंदाच्या उन्हाळा तर जणू सुर्य आग ओकतोय  शाळेला सुट्या लागल्या तरी लहान मुलं कुठल्यातरी उन्हाळी शिबिराला गळ्यात bag अडकून जातांना दिसताय .एकच मुल घरात असल्यामुळे भावंडासोबत केलेली सुट्टीची मजा लोप पावतेय . आंब्याचा रस किंवा कैरीचे पन्हे हल्ली पैसे फेकल्यावर बाराही महिने मिळतात त्यामुळे खास उन्हाळ्याची वाट पहावी लागत नाही . माणसाने स्वतःच आयुष्य सोयीच करून घेतलय खर पण छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद मात्र नक्कीच गमावलाय .
   
हिवाळ्याचही तसच ,यंदा पाउस आला वेळेवर पण त्याचा मुक्काम लांबला त्यामुळे दिवाळीची गुलाबी थंडीही पावसाखाली जाईल कि काय अशी शंका होती . ही  निसर्गाची अस्थिरता वाढतच चाललीय त्यामुळे जगाची आर्थिक ,राजकीय,सामाजीक परिस्थिती बदलतेय . दिवाळीतला सगळा उत्साह हा वाढलेल्या महागाईने ,प्रदूषणाने ,लोकांच्या विचारातील संकुचितता त्यामुळे उदासीन वाटत होता .अगदीच कसा  दमट दमट!घराघरातून येणारे चिवडा चकल्याचे  सुगंध बाजाराच्या रेडीमेड डब्यामध्ये बंद झालेत . दिव्यांची केलेली रोषणाई देखील आपल्याच घरापुरती मर्यादित होती त्यामुळे आसमंत उजळून निघाला हे वाक्य आजीच्या तोंडीच राहिलंय . सगळच बाजारीकरण झाल्यामुळे आनंदाच माप देखील कमी झालाय!
  

   
पावसा वरही काही बोलायला नको. हवीहवीशी वाटणारी पावसाची रिमझिम कधी उग्र रूप धारण करेल आणि सर्वस्व हिसाकावेल याचा नेम नाही . नुकताच केदारनाथला झालेलं नुकसान त्याच पाणी अजूनही डोळ्यातून गेलेल नाही .       
       
पण म्हणून  काय जगण सोडलेलं नाही . हेही दिवस जातील ,संकटाचे ढग दूर होतील आणि परत तसच हिवाळ्यातील गुलाबी थंडीला झाकत स्वच्छ सोनपिवळ उन्ह पडेल . पावसाळ्यातील गारवा परत सगळ्यांच्या थकलेल्या मनाला ताजतवान करेल . 
महत्वाच हेच कि मधल्या प्रवासात न थकता न कंटाळता उजाडण्याची वाट पाहण !आणि नक्की उजाडणार ह्याची खात्री बाळगण !

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...