सोसायटी मधील एक काकूंचा फोन आला "अगं आज घरी एखादी चक्कर मारशील का?"एरवी हे वाक्य खूप सहज होत मी सुद्धा लगेच उठून गेले असते कारण बाजूच्याच बिल्डिंग मध्ये जायचं होत . काकूंची सून गरोदर होती ५ वा महिना सुरु होता . भावाच्या मुलाच्या लग्नाला माहेरी गेलेल्या काकू लॉकडाऊन मुळे माहेरच्याच झाल्या होत्या. काकूंचे "चक्कर मारशील का" हे वाक्य आज खरचं चक्कर आणणारे होते .मला मात्र काकूंनी हक्काने फोन केला होता आणि तिला काहीतरी खावंसं वाटतं असेल किंवा काही त्रास होत असेल हे विचारून मला फक्त फोन वर समाचार दे एवढंच त्यांचं म्हणणं होत. तसं त्याही फोन करून विचारू शकणारच होत्या पण सुनेची रोजची वाक्य ठरलेली होती "आई मी ठीक आहे तुम्ही काळजी करू नका. "त्यामुळे मला फक्त खात्री करण्यासाठी समाचार घेण्याचे काम सोपवले होते.
आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. - पु. ल.
Monday, 21 September 2020
माहेर पणाला गेलेल्या आणि तिथेच अडकून पडलेल्या काकू
माझ्यासाठी मात्र हे एक संकटच होत . मी जाणे हे लॉक डाउन च्या काळात सुनबाई ला कितपत आवडेल ह्यात शंका होतीच. काकूंचा मात्र रोज एक फोन येत होता माहेरी भावाच्या सुनेचे कौतुक करता करता न थकणाऱ्या काकू आज मात्र धर्मसंकटात पडलेल्या दिसल्या आज सून बाईची आवडती डिश केली होती पण तिला खायला डिजिटल माध्यम आज उपयोगाचं नव्हतं . तंत्रज्ञान कितीही पुढारलेले असले तरी गरोदर सुने ची आवडती डिश आज आपण पोहचवू शकत नाही ह्याची आमच्या मॉडर्न म्हणणाऱ्या काकूंना खंत होतीच आणि त्यांनी माझ्याकडे व्यक्तही केली. त्यांचं धर्मसंकट आता कोरोना च्या जाळया सारखे माझयापर्यंत येऊन पोहचलं होत कोरोना मुळे काय करो आणि काय करोना ह्यामध्ये मी अडकले होते.
आणि एका कोरोनामय दुपारी जय्यत तयारी करून (मास्क ,गॉगल ,हॅन्ड ग्लोव्हस ,सॉक्स ) घालून मी निघाले ,बाजूच्या बिल्डिंग मध्ये हो ! ५ मजले चढत जाणे लिफ्ट चा वापर असूनही करायचा नव्हता ,दमछाक होऊन पोहचले ,दारावरची घंटी वाजवावी की कडी वाजवावी ह्या द्विधा मनःस्थिती मी होते. शेवटी कडी वाजवली दार उघडायला बराच वेळ लागला कारणहि तसेच होते ,दुपारच्या कोरोनामय उन्हात कोण आले असेल ?म्हणून नक्कीच प्रश्नवाचक चिन्ह सगळ्यांच्या चेहऱयावर निर्माण झालं होत . काकूंच्या सुनेनेच दरवाजा उघडला ते एक बरं झालं माझं काम थोडं सोपं झालं . माझं पूर्ण पॅकिंग बघून कोण असेल ???असा प्रश्न पडला असावा मी लगेच तो दूर केला ,आणि येण्याचे कारण पण सांगितले . घरात ये आधी बस थोडा वेळ मग गप्पा मारू असे आमचे नाते होते पण मी घरात जाणार नाही आणि ती घेणार नाही असा अवघड स्तिथीत समाचाराची देवाण घेवाण झाली आणि सगळे क्षेम कुशल जाणून घेतले आणि काकूंना कळवते म्हणून काढता पाय घेतला .दुसऱ्या दिवशी सुनबाईनी काकुनी जी डिश बनवली ती स्वतः बनवली ती खाली आणि भरलेली प्लेट आणि रिकामी प्लेट त्याचा फोटो facebbok वर शेयर केला आणि मला टॅग केले .
वा !!काकूंना आनंद झाला की सुनेने बनवून का होईना खालले ,सुनेला आनंद झाला आता सासूबाई परत कोणाला पाठवणार नाही मलाही आनंद झाला खाली प्लेट का होईना पण त्यात मला टॅग केले .social media वरचे एक टॅग माझ्या नावाने ऍड झाले .
Subscribe to:
Post Comments (Atom)
भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...
भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ... AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...
-
जेव्हा सक्षमच्या सगळ्या सोसायटी मधल्या मित्रांची परीक्षा असते तो काळ म्हणजे सगळीकडे शुकशुकाट पसरलेला असतो. एक शांतता सगळीकडे विखुरलेली असते...
-
आजची सकाळ खरंच काहीतरी वेगळी होती. लवकर उठायचं नाही आज कुठे धावायचं नव्हतं पण तरीही सकाळी जाग आली अगदी पहाटे पहाटे सूर्य उगवतांना सुद्धा आ...
-
नवऱ्याच्या परदेशी वाऱ्या सुरु झाल्या ,तेव्हापासून आपल्यालाही लवकरच ही सुवर्ण संधी मिळेल या अपेक्षेने माझ्याही पासपोर्ट ऑफिसच्या वाऱ्या स...
No comments:
Post a Comment