एक गमंत सांगू तुला ...खरंच खूप आवडतोस तू मला
हल्ली मोबाइल -लॅपटॉप मधून नसते सवड तुला
इनबॉक्स ला मिळालाय माझ्या वाटचा वेळ सगळा
आपल्या वायरलेस प्रेमाचा रंगच मुळी निराळा
तरी तू प्रेमाचा टाकलेला एक कटाक्ष पुरा झाला
एक गमंत सांगू तुला... खरंच खूप आवडतोस तू मला
मुद्दाम माझ्यासाठी असं काही खरेदी करीत नाहीस
पाडव्याची साडी संक्राती ला घेतोस हे काही थोडे नाही
नाही घेऊन गेलास तरी चालेल रोज बागेत फिरायला
दोघात एकच प्लेट भेळ ऑर्डर करतोस ना खायला
म्हणून ...... खरंच खूप आवडतोस तू मला
पावसामध्ये दोघांनी चिंब भिजावं अशी अपेक्षा नाही
लॉंग ड्राईव्ह ला नेणारा तू काही फिल्मी नवरा नाही
पावसावरचं गाणं लागतोस जेव्हा तू गुणगुणायला
स्वतःहून सर्दीचा काढा आणून देतोस प्यायला
म्हणून ..... खरंच खूप आवडतोस तू मला
घराच्या दारावर तुझ्या नावाची असेल जरी पाटी
कवितेतील शब्द माझे असतील पण लिहिले तुझ्यासाठी
अर्थ आलाय तू येण्यामुळे माझ्या निःशब्द भावनेला
अजून काय सांगू ..... खरंच तू खूप आवड्तोस मला
आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. - पु. ल.
Wednesday, 17 June 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...
भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ... AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...
-
आज सकाळी उठून रोजच्यासारखीच गॅल्लरी मध्ये मॅट घेऊन गेली आज पण प्राणायाम करूनच दिवसाला सुरवात करायची असा निश्चय केला होता . Lockdown चे दिव...
-
आजची सकाळ खरंच काहीतरी वेगळी होती. लवकर उठायचं नाही आज कुठे धावायचं नव्हतं पण तरीही सकाळी जाग आली अगदी पहाटे पहाटे सूर्य उगवतांना सुद्धा आ...
-
मी माझ्या मुलाला शाळेत पाठवत नाही मग तो शिकतोय कसा ???सगळ्यांमध्ये वेगळा दिसून येतोय खरा . हा प्रश्न माझ्यापेक्षा आजूबाजूच्या लोकांना जा...
No comments:
Post a Comment