अजून चार दिवस बाकी होतेआपल्या भेटीला
हे कसे समजवावे या व्याकुळ वेड्या मनाला
पाहुण्यांच्या गर्दी मधूनही मला टिपणारी नजर तुझी
सुंदर तयार झाल्यावर हसून मिळालेली दाद नजरेची
स्पर्शानेच व्यक्त व्हावे असं काही जरुरी नाही
डोळ्यांची भाषा बोलायला शब्दांची गरज नाही
आजूबाजूला असणारा तुझा भास देखील आहे पुरेसा
तुझ्या असण्याने दिवसभरचा थकवा होतो नाहीसा
तू केलेली तारीफ मला नकळत वेडावून सोडते
तुझ्या तोंडून परत परत तेच ऐकावेसे वाटते
गोऱ्या गालावर सगळी लाली एकवटून जाते
आधीच लाल झालेली माझी कळी अधिकच खुलते
झोपेत असताना तुला बघण्याचे सुखच वेगळे आहे
तुझ्या स्वप्नात येण्याची मला परवानगी हवी आहे
तू स्वप्न पाहावे आणि मी त्यामध्ये रंग भरावे
पहाटे जाग येताच समोरही तू मलाच बघावे
तुझ्यासोबत मिरवण्याचा आनंदच वेगळा आहे
हातात हात घालून चालतांना आसमान ठेंगणे आहे
प्राजक्ताचा सडा पडावा ,आणि मातीला सुगंध सुटावा
तसाच तुझा हळुवार स्पर्श मला शहारून सोडावा
आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. - पु. ल.
Wednesday 17 June 2020
हळुवार तुझी चाहूल का दरवळतो मज उर ......
Subscribe to:
Post Comments (Atom)
भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...
भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ... AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...
-
वडाचे झाड आणि त्याच्या लांबच लांब पारंब्या हे मला नेहमीच एक गूढ प्रतीक वाटत आलंय . लहानपणी शाळेत जातांना रस्त्यामध्ये एक खूप जुने वडाचे झाड ...
-
माझ्या डोक्यात बरेचदा विचार येतो कुठले दिवस असतील जे मी परत जगता यावे म्हणून देवाकडे मागेल? 'back to school ' एकमेव उत्तर. क्या द...
-
काळ्या कुट्ट अंधारातून ,दगडांमधून पायवाट शोधत प्रवास सुरु होता . सोबत दूरवरून येणारा पाण्याचा आवाज आणि रातकिड्यांची किरकिर ह्यापलीकडे सग...
No comments:
Post a Comment